101+ Best मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे

नमस्कार या लेखात तुमचे स्वागत आहे. येथे तुम्हाला एकदम मस्त आणि लक्षात ठेवायला सोपे असे 101+ Best मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. जेव्हाही आपल्या घरात लग्न समारंभासारखे कार्यक्रम असतात आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही नवरी मुलगी असाल तर अशा वेळी हळदीचा कार्यक्रम असो वा लग्नानंतर सासरच्या कडील कार्यक्रम असो नवरी मुलगीला उखाणे घ्यावेच लागतात.

लग्नसमारंभाच्या आधी आणि नंतर देखील आपल्याकडे मराठी उखाणे नवरी साठी आणि मराठी उखाणे नवरदेवासाठी घेण्याची परंपरा सर्व महाराष्ट्रात सुरु आहे आणि अशा वेळी तुम्ही घाबरून जाता. अशा परिस्थितीला तुम्ही योग्य रित्या सामोरे जाण्यासाठी तुमच्या साठी आम्ही घेऊन आलेलो आहोत 101+ Best मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे.

1) मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
…. रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान

2) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जनं

3) गोकुळ सारखं सासर, सारे कसे हौशी
…. रावांचे नांव घेते, तिळ संक्राती च्या दिवसी

4) माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने
…. रांव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे

5) कपाळाचं कुंकु, जसा चांदण्याचा ठसा
… रावांचे नांव घेते, सारे जन बसा

6) रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा

7) खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद

8) पंच पक्कांना च्या ताटात, वाढले लाडू पेडे
… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे

9) मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ति
… रावांचे नाव घेऊन करते इच्छापुर्ती

10) सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात
… रावांचे नांव घेते, … च्या घरात

11) कपाळावर कुंकु, हिरवा चुडा होती
… रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती

12) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा

13) संसार रूपी वेलीचा गगनात गेला झुला
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला

14) अंगणात वृंदावन, वृदांवनात तुळस
…..रावांच नांव घेताना, कसाल आला आळस

हे देखील वाचा :

15) पतीव्रतेचं व्रत घेऊन, नम्रतेने वागते
…..रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते

16) लावित होते कुंकु, त्यात पडला मोती
…..रावां सारखे मिळाले पति, भाग्य भानु किती

17) ताजमहाल बांधायला, कारागीर होते कुशल
…..रावांचे नाव घेते, तुमच्या साठी स्पेशल

18) कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेची माहेर
…….रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर

19) शंकराची पूजा पार्वती करते खवाली वाकुन
……रावांचे नांव घेते, सर्वांना मान राखुन

20) श्री विष्णुच्या मस्तकावर सदैव असतो शेष
……रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश

21) यमुना जलावर पडली ताजमहालची सावली
……रावांची जन्मदाती धन्य नी माऊली

22) अभिमान नाही संपनिचा, सर्व नाही रुपाचा
……रावांना घास घालते वरण भात तुपाचा

23) लोकमान्य टिळक स्वरान्यवाय हिस
……रावांचे नांव घेऊन उरवाना करते ‘गुग

24) पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार
……रावांच्या नावाने घालते मंगळ सुत्रांचा हार

25) आकाशी चमकती तारे, जमिनीवर चमकती हिरे
…..राव हेच माझे अलंकार गरे

26) पुजेच्या साहीत्यात उद्घत्तीचा पुडा
……रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा

27) सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान
…..रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान

28) राज हंस पक्षी शोभा देतो वनाला
……रावांचे नाव घेते. आनंद माझ्या मनाला

29) श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन
……रावांच्या जिवनात आदर्श संसार करीत

30) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
……रावांचे नाव घेते पली या नात्याने

31) वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल
……रावांचे जीवनात टाकले मी पाऊल

32) घातली मी वरमाला हसले राव गाली
……थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.

33) जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन
…….घडविले देवानी रावांना जीव लावून

34) धरला यांनी हात, वाटली मला भिती
हळूच म्हणाले … राव अशीच असते प्रिती

35) नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन
……रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन

36) हदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात
……रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात

37) नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर
आई-वडील विसरले ………..रावांसाठी सुटला प्रिताचा पाझर

38) राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार
……रावांनी घातला मला मंगळ सुत्राचा हार

39) पोर्णिमा चंद्र आकाशात दिसतो साजरा
……रावांनी आणला मला मोगन्याचा गजरा

40) चांदीचे जोडवे पतीची खुन
….…रावांचे नाव घेते, ….ची सुन

41) दारी होता टेबल, त्यावर होता-फोन
……रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं कौन ?

42) अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे …..रावांची राणी

43) गुलाबाचे फुल दिसायला ताजे
…..रावांचे नाव घेते, सौभाग्य माझे

44) डाळिंबाचे झाड, पानोपाणी दाटले
……रावांचे नावाने घेतांना आनंदी मला वाटले

45) ओल्याचींब केसांना, टावल द्या पुसायला
……रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला

46) दाळींब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल
……रावांच्या नावाने कुंकु लावते लाल

47) अंगणात होती मेथी, पाणी घालु किती
……रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी

48) हिमालय पर्वतावर, पाणी घालु किती
……रावांचे नाव घेत च्या दिवशी

49) वेळेचे काळचक्र फिरते रांत्रदिवस कधी पुनव कधी अवस
…….रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस

50) शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल
…….रावांच्या संसारात टाकते पहीले चाहूल

51) गृह कामाचे शिक्षण देते माता
……रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता

52) दीन दुबळत्यांचे गऱ्हाणे परमेश्वरानी ऐकावे
…..रावा सारखे पति मिळाले आनखी काय मागावे

53) पोर्षातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला
……रावांचे नाव घेते सूर्यनारानाच्या साक्षीला

54) चंदेरी सागरात, रुपेरी लाटा
……रावांच्या सुखदुःखात अर्धामाझा वाटा

55) नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे
…..रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे

56) स्वातंत्र्याचा होमकुंडात विरांनी घेतली उडी
……रावाच्या नावाने घालते गळयात मंगळ सुत्राची जोडी

57) …..रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा

58) र्पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल
……रावाच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल

59) तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले
……रावांचे मन, मी गुलाबाचे फुल

60) केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल
……राव माफ करतात माझी प्रत्येक भुल

61) मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले
……रावांचे हेच रूप मला फार आवडले

62) आज सारे सुख माझ्या दारी दाटले
……रावांचे प्रेम अजुन तरी नाही आटले

63) मला गुणवान पति मिळाला, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा
…..राव आहे माझ्या जीवनातील मौल्यावान ठेवा.

64) सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा
…….रावामुळेच लागला मला त्याचा लळा

65) शिक्षणाने विकसि होते, संस्कारती जीवन
……रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन

66) इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग
……रावांच्या संसारात मी आहे दंग

67) निळया नभात चंद्राचा प्रकाश
……रावांवर आहे माझा विश्वास

68) प्रेमाचे कच्चे धोगे खेचती मागे पुढे
…….रावांच्या साठी सारा माहेर सोडावे लागे

69) प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची
…….रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

70) चंद्राचा झाला उद्य समुद्राला आली भरती
……रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती

71) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार
……रावांचा स्वभाव अहे फारच उदार

72) करवंदाचवी साल चंदनाचे खोड
……रावांचे बोलने अमृतापेक्षा गौड

73) सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले
…..रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले

74) वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
…..रावांसह मला आपला आशीर्वाद हवा

75) सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
….रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.

76) मंगलदेवी, मंगलमाता वंदन करते तुला
…..रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला

77) पिवळा पितांबर श्रीकृष्णाचा अंगावर घातला
……रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला

78) पतीव्रतेच व्रत घेऊन, नम्रतेने वागते
……रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते.

79) सासुसासन्यांनी म केलं एक पुंन्याचे
……रावांना दान दिले मला जन्माचे

80) गळयात मंगळसुत्र, मंगळ सुत्रात डोरलं
……रावांचे नाव माझ्या हृदयात कोरल

81) मंद मंद गंध घेताना झाले मी धुंद
……रावांचे नाव घ्यायचा लागला मला छंद

82) पेरुची फोड दिली पिंजन्यातल्या पोपटाला
……रावांचे नाव घेते चंद्र तारे साक्षीला

83) कशी बाई कोकीळा, कुहू कुहू बोले
.…. रावांनी आणले माझ्यासाठी सोन्याची कर्णफुले

84) मंदिराच्या गाभान्या विठ्ठलाची मुर्ती
……रावांची होबो सागळी कडे किर्ती

85) चांदीच्या चमच्याने वाढते मीठ
घाबरू नका ……रावांचा संसार करीन मी नीट

86) आपले राष्ट्रगीत आहे जनगणमन
……रावांना अर्पण केले तन, मन, धन

87) आधुनिक स्वयंपाक घरात शोभतो डायनिंग टेबल
…….रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल

88) दिल्ली राजधानी आहे भारताची, मुंबई राजधानी आहे महाराष्ट्राची
…..राव आहेत तर कमी नाही कशाची

89) पुर्णा नदिच्या काठावर कृष्ण वाजिवितो बासरी
……रावा सोबत आले मी सासरी

90) आम के पेड़ पर बैठे थे बंदर
……रावजी का घर है स्वर्ग से सुंदर

91) इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणात वॉटर
……रावांचे नाव घेते ……..डॉटर

92) सायकल चालते वेगाने, नस धावते क्रमाने
…….रावांच नाव घेते, तुमच्या म्हणण्या प्रमाने

93) हिमालय पर्वतातुन नदी वाहते कनिका
…….रावांच नाव घेते बालिका

94) इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणता मुन
…….रावांच नाव घेते….सुन

95) गुलाबाचे फुल मधोमध पिवळे
……राव दिसतात कृष्णासारखे सावळे

96) चतुर्थीच्या दिवशी चंद्र निघाला पिवळा
…..राव बसले पुजेला आणि मी निवडते दुर्वा

97) दत्ताच्या फोटोला हार घालते वाकुन
…..रावांचे नाव घेते तुमचा मान राखुन

98) कवीची कविता कवीनेच वाचावी
…..रावांची प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी

99) अंगणी टाकला सडा त्यावर घातली रांगोळी
……रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे वेळी

100) जीवन रुपी कादंबरी वाचली दोघांनी
…….रावांचे नाव घेते पत्नी या नात्यानी

101) ज्योलीळा मिळेल ज्योत आता पडेल प्रकाश
……रावांच्या जीवनात ठेंगणे होईल आकाश

102) गुलाबाचं फुल दिसायला छान
…….रावांच नाव घेते ठेवते आपला मान

103) ज्ञानदानाने करते मी कर्तव्य पुर्ती
…….रावांच्या शब्दांनी मिळते मला स्फूर्ती

104) चांगली पुस्तके आहेत मानसांचे मित्र
……..रावांच्या सहवासात रंगविते संसाराचे चित्र

105) विद्येचं माहेर घर आहे म्हणतात पुणं
……..रावांच्या सहवासात/जीवनात/संसारात महा नाही उणं

106) गुलाबाच्या फुलाचा लाजवाब सुगंध
………रावांना केले मी हृदयात बंद

107) इंग्रजी भाषेत गवताहा म्हणतात ग्रास
……..रावांचे नाव घ्यायला वाटत नाही त्रास

108) तानाजी-शिवाजींचे जीवलग मित्र
……..रावांनी आणले माझ्यासाठी मंगळ सुत्र

109) श्रावणात महादेवाहा दुधाचा अभिषेक
……..रावांच्या नावाने बेह वाहीले एकशे एक

110) गणेशाला आवडती रक्तवर्ण कमळे
…….रावा सोबत माहेर विसरुन रमले

111) कविंच्या कवितेत मोरोपंताची आर्या
…….रावांचे नाव घेते…भार्या

वरती दिलेले 101+ Best मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की Comment करून सांगा. आणि जर या 101+ Best मराठी उखाणे नवरी साठी | मराठी उखाणे व्यतिरिक्त तुम्हाला कुठले नवीन मराठी उखाणे नवरी साठी किंवा उखाणे मराठी नवरदेव साठी माहित असेल तर नक्की येथे आमच्या सोबत Share करा तुम्ही Share केलेले मराठी उखाणे या लेखात नक्कीच समाविष्ट करू.

Leave a Comment