80+ Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी

आत्ता पर्यंत जर तुम्हाला नवीन marathi ukhane for female, ukhane in marathi for female marriage, ukhane marathi funny, comedy ukhane, marathi ukhane for female romantic, त्याचबरोबर modern marathi ukhane for female, funny ukhane in marathi for female, naav ghene in marathi for female, ukhane marathi female मिळाले नसेल तर आता चिंता नका करू.

सर्व प्रकारचे मराठी उखाणे आता इथेच मिळेल त्यामुळे बिनधास्त होऊन छान छान मराठी उखाणे वाचा इथे दिलेले मराठी उखाणे वाचण्यास एकदम सोप्पे आणि लक्षात ठेवण्यास देखील तेवढेच सोप्पे आहे.

1) सोन्याच्या ताटात चांदीची वाटी सात जन्म घेइल मी
….रावां साठी

2) रोज माझ्या अंगणात रांगोळी सजते
……रावांच्या डोळ्यात सदैव माझेच प्रतीबिंब दिसते

3) घन निळा सुसाट वारा
….राव छेडीती माझ्या हृद्याच्या तारा

4) सासरी आहेत माझ्या सासु, सासरे अन् दिर
….रावांना आवडते खव्याची खीर

5) दोन वाती दोन ज्योति दोन शिंपले दोन मोती
…..रावांची राहो मी अखंड सौभाग्यवती

हे देखील वाचा :

6) नयन रम्य बागेत नाचत होता मोर
…..रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर

7) नीलवर्ण आकाशात पक्षी उडाले सात
रावांच्या हातात दिला मी हात करण्या जन्मोजन्मीची साथ

8) पोर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला पिवळा
….राव बसले पूजेला मी निवडते दुर्वा

9) निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी
…..रावांचे नाव घेते ….च्या दिवशी

10) झुळू झुळू वाहे चंद्रभागा, मंद चाले होडी, परमेश्वरा सुखीठेव
….अन् … रावांची जोडी

11) असा असावा सुखी संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार
….राव आहेत माझ्या जीवनाचा आधार

12) टिळकांचा केसरी अत्र्यांचा/ललकार
…..रावांची विद्वत्ता हाच माझा अलंकार

13) भक्तांच्या भेटीसाठी वेडा झाला नंदाचा नंदन
….रावांचे नाव घेऊन मंगळा गौरीहा करते वंदन

14) आहारे जीवा नको करु हेवा
…..रावांच्या चरणांची करेह सेवा तर मिळेल मोक्षाचा ठेवा

15) चांदीच्या निरंजनात मनोभावे लावते फुलवात
…..रावांच्या सोबत करते सुखी जीवनाला सुरवात

16) तानसेन मेघ बरसण्यासाठी आळवित असे मेघ मल्हार
….रावांसारखे प्रेमळ पती लाभले मला सहचर

17) फुलात फुल जाईचे प्रेमात प्रेम आईचे
….राव आहेत माझ्या प्रितीचे

18) घरावर परडं परड्यात गहू, तुमच्या आग्रहासाठी
….रावांच नाव किती वेळा घेऊ

19) महादेवाच्या पिंडीवर संत्र्याची फोड
….रावांच बोलन साखरेहून गोड

20) चांदीच्या सुपात फणसाची गरे
….राव दिसतात बरे पण वागवतील तेव्हा खरे

21) राजहंस पक्षी खातो, मोत्याचा चारा
…..रावांच्या संसारात नाही दुःखाचा वारा

22) अंगठीत चमकतो हिरा, आकाशात चमकतो तारा
….रावांसारखे पती मिळाले हाच भाग्योदय खरा

23) गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा स्वरुपाचा
….रावांचे नाव घेते, संसार करते सुखाचा

24) घराला असावे अंगन, अंगणात डोलावी तुळस
……रावांच्या नावाचा संसारावर चढविन कळस

25) लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार
…..राव माझे दिसतात फारच रुबाबदार

26) कुंकु लावते ठळक, हळद लावते किंचीत
…..रावांच नाव घेते हेच मांडा संचीत

27) जिथे घराची स्वच्छता, तिथे घराची शोभा
…..रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा

28) सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा
….रावांचा आणि माझा सात जन्माचा जोडा

29) नविन निघाल्या कादंबऱ्या वाचून घ्यावा बोध
…. रावांच्या जीवनात लागला सुखाचा शोध

30) नभी उमटले सप्तरंगाचे इंद्रधनुष्य
….. रावांचे नाव घेते मिळी दिर्घायुष्य

31) रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
…. रावांच नाव घेते आज दिवस आहे खास

32) सुर तेच छेडीता शब्द उमटले नवे
….. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे

33) जीवनासाठी कहा म्हणुन कहेवर केली मात कलात्मक
जीवन जगण्यासाठी ….रावांच्या हाती दिला हात

34) पोर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर पडतो, चंद्राचा प्रकाश
गृहलक्ष्मी सह भाग्यलक्ष्मी येवो … रावांच्या घरात

35) नाव घ्या ! नाव घ्या ! सगळे झाले गोळा
…..रावांचे नाव आहे लाख रुपये तोळा

36) सागरतिरी शुभ्र वाळू
…..राव म्हणतात चल राणी टेनिस खेळू

37) सोन्याचे मणी रेशमात गुंफले
…..राव माझे वाचनात गुंतले

38) थंडगार पाण्याला आला सुवास
….रावांचे नाव घेते जोडी आमची खास

39) शुभदिनी, शुभकाळी, आली आमची वरात
…..रावांचे नाव घेते ……च्या घरात

40) शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने
…..रावांचे नाव घेते प्रेमभाव भक्तीने

41) संसाररुपी सागरात उसळल्या लाटा
…..रावांच्या सुखदुःखात माझा अर्धावाटा

42) पानोपानी फुल फुलावे, रंग गहीरे असावे
…..रावांच्या सहवासात सुख माझे हसावे

43) चंद्राची जशी चंद्रीका, वसिष्ठांची जशी अरुंधती
तशीच मी होईन … रावांची आवडती

44) जिर साळीचा भात पिकतो मावळात
…..रावांचे नाव घेते ….च्या देवळात

45) पुणेरी टांगा त्याला अरबस्तानी घोडे
….रावांचे नाव घेते सत्यनारायनापुढे

46) देवा जवळ करते मी दत्ताची आरती
….राव आहेत माझ्या जीवनाचे सारथी

47) प्राजक्ताच्या पायथ्याशी, शुभ्र फुलांच्या राशी
…..रावांचे नाव घेतांना, मनात दाटली खुशी

48) भावनात जन्मली कल्पना, फुल गुंफीले शब्दांचे
…..रावांच नाव घेते मन राखुन सर्वाचे

49) चालली सप्तपदीची सात पावले
…..रावांच्या नावाने मंगळसुत्र बांधले

50) आषाढांत दाटले घन, मोर नाचतो होऊन विभोर
…..रावांचे नाव घेते. सर्वासमोर

51) कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मीणीने लिहीले पत्र
….रावांसाठी घातले मी मंगळ सुत्र

52) सत्यम्, शिवम्, सुंदरम् साहीत्याची आस
…रावांना घातले मी लाडवाचा घास

53) एका वाफ्यातली तुळस दुसन्या वाफ्यात रुजवली
….ची साही मानसे मी आपली मानली

54) पेटी वाजे वीणावजे सतार वाजे छान
….रावांच नाव घेते सर्वाचा राखुन मान

55) श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
…..राव आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य

56) छत्रपती शिवरायाला जन्मदेनारी धन्य जिजाऊ माता
…रावांच नाव घेते आपल्या शब्दा करीता

57) जीवनात ही घडी अशीच राहू दे
…. रावांची प्रीत सदैव अशीच फुलु दे

58) माहेरचे निरांजन सासरची वात
रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात

59) सासरच्या कौतुकात राहीले नाही काळाचे भान
…. रावांच नाव घेते, सर्वांचा राखुन मान

60) कुलदेवतेला स्मरुन वंदन करते देवाला
…. रावांचे सौराग्य अखंड दे मला

61) कपाळाचा कुंक गळ्यात मोत्याचा हार
…. रावांचे नाव घेतांना आनंद होतो फार

62) संसारात स्त्रीने नेहमी रावे दक्ष
…. रावांचे नाव घेतांना इकडे द्या लक्ष

63) मन असावे स्वच्छ प्रेमळ आणि पवित्र
…. रावांच्या जीवनात राहो आनंद सर्वत्र

64) मोठ्यांचा करावा मान सन्मान
…. रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण

65) शुक्राची चांदनी ढगाला देते शोभा
…. रावांला पाठीमागे परमेश्वर उभा

66) आई वडील, करीत होते काळजी, कसे मिळते घर
…. रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर

67) ‘जाई जुईच्या वेलीखाली हरीण घेते विसावा
…. रावांच नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा

68) चांदीच्या ताटात लावते तुपाची फुलवात
…. रावांचे नाव घेऊन आजपासुन करते संसाराला सुरवात

69) प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, प्रेमाचा असावा साठा
…. रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा

70) निलवर्णी आकाशात मधुर पक्षांचा टाहो
…. रावांच नाव घेते, अखंड सौभाग्य राहो

71) नेत्रांच्या निरांजनात प्रितीची वात
…. रावांच्या नावाने संसाराला करते सुरवात

72) नील नभांगण जणु अंगठी, चंद्र शोभे त्यातला खडा
ईश्वर सदा सुखी ठेवो … रावनी माझा जोडा

73) नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखचा
…. रावांच्या बरोबर संसार करीन सुखाचा

74) सरस्वतीच्या मंदीरात साहीत्याच्या राशी
…. रावांचे नाव घेते शुभ मंगल दिवशी

75) सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश
…. राव हेच माझ्या जीवीताचे परमेश

76) संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते
…. दिवस म्हणून …. रावांचे नाव घेते

77) कोसळल्या जलधारा, धरा आनंदली रातोरात
…. रावांच्या सहवासात होवो सौख्याची बरसात

78) जलाशयात असते जसे निर्मळ पाणी
तशीच मी …. रावांची सहधर्मचारीणी

79) लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रद्धेचे बळ
…. रावांच्या संसारी दे समृद्धीचे फळ

80) स्वप्नातला गुलाब गालात हसला
….रावांचे नाव घेन्यास मान कसला

81) कृष्णाच्या हातात सोनेरी बासरी
…. रावांचे नाव घेतांना सदा मी हसरी

82) रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाला मोहीत
….रावांना आयुष्य मागते सासुसासन्या सहीत

83) अमावस्येच्या रात्री चांदोबाचं लपणं
…. राव हेच माझं गुलाबी स्वप्न

84) नको मोहन माळ नकोहिन्याचा हार
…. रावांच्या जीवनात मी सुखी फार

या लेखात दिलेले सर्व 80+ Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की Comment करून सांगा. आणि अशाच प्रकारच्या इतर नवीन marathi ukhane for female, ukhane in marathi for female marriage, ukhane marathi funny, comedy ukhane.

marathi ukhane for female romantic, त्याचबरोबर modern marathi ukhane for female, funny ukhane in marathi for female, naav ghene in marathi for female, ukhane marathi female वाचण्यासाठी ilovestatus.in या Website ला पुन्हा visit करा.

1 thought on “80+ Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे नवरी साठी”

Leave a Comment