रायगड किल्ला माहिती | Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ला माहिती | Raigad Fort Information in Marathi

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगणारे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांशी अखेरच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ असलेले मावळे त्या मावळ्यांना घेऊन महाराजांनी स्वराजाचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या प्राणाची देखील पर्वा केली नाही. असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज अख्खे महाराष्ट्र जो आपल्या छत्रपती शिवरायांना आपला आराध्य दैवत मानतो त्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेला महाराजांच्या कर्तृत्व आणि पराक्रमाबद्दल तर ठाऊकच आहे.

छत्रपती शिवरायांचे पराक्रम आणि कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून मोठी झालेली महाराष्ट्रातील मंडळी आपल्या परिचयाची आहे. पण याच बरोबर महाराजांच्या गडकिल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती असणे देखील तितकेच अनिवार्य आहे. महाराज्यांच्या किल्याच्या इतिहासाबद्दल माहिती आणि त्या किल्यांचे आता काय स्वरूप आहे? रायगड किल्ल्याची निर्मिती कोणी केली? रायगड किल्ल्याची माहिती मराठी – रायगड किल्ल्याचा इतिहास – Raigad Fort History in Marathi, रायगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे कोणकोणती आहेत?

अशी बरीचशी प्रश्ने घेऊन जेव्हा तुम्ही भविष्यात दुर्गभ्रमंती करण्याचा विचार कराल तर या रायगड किल्ल्याची माहिती मराठी मध्ये वाचून तुम्हाला या माहितीचा मार्गदर्शिका म्हणून नक्कीच फायदा होईल.. चला तर मग या Article मध्ये महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याविषयी माहिती जाणून घेऊयात.

रायगड किल्ला माहिती | Raigad Fort Information in Marathi

कोंकणातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील गिरिदुर्ग प्रकारातील हा एक किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे २७०० फूट उंचीवर आहे. रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी. त्याला गडाचे स्वरुप नव्हते. तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्याला रासिवटा तण अशी दोन नावे होती.

रायगड किल्ल्याचा इतिहास | Raigad Fort History in Marathi

निजामशाहीत या गडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. ६ एप्रिल १६५६ रोजी शिवरायांनी रायरी किल्ला जिंकून घेतला. तेथे असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी शिवरायांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायरीवर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. हिरोजी इंदूलकरांनी (रायगडाचे इंजिनियर) या गडाच्या बांधकामाची जबाबदारी घेतली.

रायरीचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा आणि पुरेसा आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. शिवाय शत्रूला जिंकायला अवघड हे पाहून असे हे ठिकाण शिवरायांनी राजधानीसाठी निवडले. या गडाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्याचे नाव ‘रायगड’ असे ठेवले.

आधी राजगड हा किल्ला सुमारे २६ वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी होती, त्यानंतर राजधानी रायगड किल्ल्यावर हलवण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. राज्याभिषेकापूर्वी म्हणजे १९ मे १६७४ रोजी शिवरायांनी प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. नंतर शनिवार ६ जून १६७४ या दिवशी शिवराज्याभिषेक साजरा झाला. याच गडावर ४ फेब्रुवारी १६७५ रोजी संभाजी राजांची मुंज झाली. ७ मार्च १६८० रोजी राजाराम महाराजांचीही मुंज झाली आणि लगेच आठ दिवसांनी त्यांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी इथेच झाले.

रायगडाने अनुभवलेला दुःखद प्रसंग म्हणजे चैत्रशुध्द पौर्णिमा हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी शिवाजी महाराजांचे निधन रायगड या किल्ल्यावर झाले, १६ फेब्रुवारी १६८१ रोजी रायगडावर संभाजी महाराजांचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.

रायगड किल्ल्याची निर्मिती कोणी केली | रायगड किल्ला कोणी बांधला?

इ. स १०३० मध्ये रायगड किल्ल्याची निर्मिती चंद्रराव मोरे यांनी केलेली होती. दौलतराव मोरे हे जावळीचे जहागीरदार होते. ते १६४५ साली मरण पावले त्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये तंटे सुरु झाले. या प्रकरणात शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्याबदल्यात शिवराय आणि मोरे यांच्यात काही करार झाले परंतु मोरे गादीवर बसल्यानंतर सर्व विसरला.

परिणाम स्वरूप हा किल्ला यशवंतराव मोरे याच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ मध्ये आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्यावर अनेक महत्वाची बांधकामे केलेली होती आज आपण किल्ल्यावर जी बांधकामे पाहतो ती शिवाजी महाराजांच्या काळातील आहेत आणि किल्ल्याच्या पायथ्याशी रायगडवाडी आणि पाचाड हि गावे वसलेली आहेत.

हे सुद्धा वाचा : —>

रायगड किल्ला पाहाण्यासारखी ठिकाणे | रायगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे कोणकोणती आहेत?

 • पाचाडचा जिजाबाईचा वाडा :

उतारवयात गडावरची थंड हवा, वारा, जिजाबाईंना मानवत नसे. म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. इथं पायऱ्यांची विहीर तसेच मासाहेबांना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास तक्क्याची विहीर असेही म्हणतात.

 • खुबलढा बुरुज :

गड चढू लागले असता खुबलढा बुरुज दिसतो. शेजारी एक दरवाजा होता. त्यास ‘चित दरवाजा’ म्हणत. आता तो उध्वस्त झाला आहे.

 • नाठो दरवाजा :

याचा अर्थ लहान दरवाजा. या दरवाजास दोन कमानी आहेत. आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या लहान खोल्या आहेत. त्यास देवडाम्हणतात.

 • मशीद मोर्चा :

चित दरवाजाने नागमोडी वळणे घेत. पुढे गेल्यावर सपाटी लागते. तेथे दोन पडक्या इमारती दिसतात. एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

 • महादरवाजा :

याच्या बाहेरील अंगास दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. त्याचा अर्थ आत लक्ष्मी आणि सरस्वती नांदत आहेत. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके आहेत त्यांना जंग्या म्हणतात. त्यातून शत्रूवर मारा करतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

 • स्तंभ :

गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात. ते पूर्वी पाच मजली होते असे म्हणतात.

 • राजभवन :

बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की, जो प्रशस्त चौथरा लागतो तेच महाराजांचे राजभवन. त्याचा चौथरा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. राजप्रसादाजवळील स्तंभाच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे. तीच ही रत्नशाळा. हा गाजारपट खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेलीखोली असावी असेही म्हणतात.

 • राजसभा :

राजसभा २२० फूट लांब आणि १२४ फूट रुंद आहे. पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन होते. या ठिकाणीच महाराजांचा राज्याभिषेक झाला.

 • नगारखाना :

सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की, आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

 • बाजारपेठ :

नगारखान्याकडून आपण डावीकडे उतरुन आलो की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ, पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. मधून चाळीस फूट रुंद रस्ता आहे.

 • शिर्काई देऊळ :

गडावरील मुख्य देवतेचे हे देऊळ महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस आहे.

 • जगदीश्वर मंदिर :

बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदिश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला की सभामंडप लागतो. मध्यभागी भव्य कासव आहे. आत भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख आहे. – ‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर’ शिवरायांचा स्वामिनिष्ठ सेवक हिरोजी इटळकर उर्फ इंदूलकर याने गडावर विहिरी तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे यांची उभारणी केली.

 • महाराजांची समाधी :

मंदिराच्या पूर्वेला अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी. समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक तर उजवीकडे दारुची कोठारे, बारा टाकी (तळी) दिसतात.

 • कुशावर्त तलाव :

होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहे.

 • वाघ दरवाजा :

कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. महाराजांनी महादरवाजाशिवाय आणखी हा एक दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरु शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिकार खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.

 • टकमक टोक :

बाजारपेठेच्या समोरील टपावरुन खाली उतरुन टकमक टोकाकडे जाता येते. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. गद्दारी करणाऱ्याचा इथेकडेलोट केला जाई.

 • हिरकणी बुरुज :

हिरकणी बुरुज ही रायगड किल्ल्याच्या आवारातील एक प्रसिद्ध भिंत आहे जी आजही मजबूत आहे. उंच कड्यावरून बांधलेल्या या भिंतीला एक रंजक कथा जोडलेली आहे. स्थानिक लोककथेनुसार, जवळच्या गावातील हिरकणी नावाची एक महिला रायगडावर दूध विकण्यासाठी आली होती.

मात्र, सूर्यास्तानंतर भिंतीचे दरवाजे कुलूप लावल्याने ती किल्ल्याच्या आत अडकली होती. शेजारच्या गावातून तिच्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून, एक चिंताग्रस्त हिरकणी दुसर्‍या दिवशी सकाळी दरवाजे उघडण्याची वाट पाहू शकली नाही आणि रात्रीच्या काळोखात धैर्याने खडकावर चढली. हा पराक्रम ऐकून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चकित झाले आणि तिच्या शौर्याचे कौतुक म्हणून हिरकणी बुरुज बांधला.

रायगडावर जाण्यासाठी मार्ग

पुण्याहून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गेपाचाड गावातून रायगडाच्या दोर वाटेने (रोपवे) तळावरून पाचाड खिंडीत येता येते. तेथून अवघ्या १४३५ पायऱ्या चढून गेलो की रायगडमाथा गाठता येतो. पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुध्द दिशेस अवघ्या ४-५ मिनिटाच्या चढणीवर एक गुहा आहे तिला ‘वाघबीळ’ म्हणतात. जगातील इतर गुहापेक्षा पूर्ण वेगळी असलेली ही गुहा थंड वाऱ्याच्या झुळुकीने सारा थकवा दूर करते. इथे अश्मयुगीन मानवाची वस्ती होती.

रायगड किल्ल्यावर कसे जाणार ?

रस्तामार्गे : रस्तेमार्गाने जायचे झाल्यास तुम्ही एसटी बसने जावू शकता किवा आपल्या खाजगी वाहनाने सुद्धा जावू शकता. त्यासाठी तुम्हाला पुण्याहून किवा मुंबईहून रायगड या शहराला पोहचावे लागेल.

रेल्वेमार्गे : रेल्वेनी जायचे झाल्यास रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे माणगाव रेल्वे स्टेशन. आपण मुंबई, बेंगलोर, चेन्नई आणि दिल्ली येथून माणगाव स्टेशनला रेल्वेने जावू शकता आणि तेथून रायगड वर जाण्यासाठी बस किवा टॅक्सी पकडून जावू शकता.

हवाई मार्ग : हवाई मार्गाने जायचे झाल्यास रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी Direct विमानसेवा नाही. जर तुम्हाला विमानाने जायचे असेल तर सर्वात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे. पुण्याहून रायगड पर्यंत बस किवा टॅक्सी ने जाऊ शकता. पुण्याहून रायगड पर्यंतचा प्रवास २ तासांचा आहे.

रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचे प्रवेश शुल्क

भारतीयांसाठी १० रुपये आणि विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये प्रवेश फी आहे.

रायगड किल्ला माहिती या Article मधील सर्व माहिती वाचून तुम्हाला रायगड किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती मिळालीच असेल त्याचबरोबर रायगड किल्ला इतिहास काय आहे? रायगडावरील प्रेक्षणीय स्थळे कोणकोणती आहेत? रायगड किल्ल्यावर कसे जायचे? रायगड किल्ल्यावर जाण्यासाठीचे प्रवेश शुल्क किती?

Note : रायगड किल्ला माहिती या Article दिलेली सर्व माहिती १००% अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीपण चुकीने काही माहिती चुकीची आढळल्यास कृपया Comment Box मध्ये त्याविषयी कळवा तुम्ही दिलेली माहिती अचूक असल्यास तात्काळ या लेखात जोडली जाईल.

रायगड किल्ला माहिती, रायगड किल्ल्याची माहिती मराठी या लेखातील माहिती खरंच उपयोगी वाटली असेल तर आपल्या मराठी लोकांपर्यंत Share या बटनावर Click करून पोहचवा जेणेकरून आपल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांविषयी अधिकची माहिती पोहचेल. धन्यवाद….

FAQ

Que. 1. रायगड किल्ल्याचे जुने नाव?

Ans. रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी

Que. 2. रायगड किल्ला कोणी बांधला?

Ans. इ. स १०३० मध्ये चंद्रराव मोरे यांनी बांधला.

Que. 3. रायगड किल्ला पाहाण्यासारखी ठिकाणे कोणती?

Ans. रायगड किल्ल्यावरती पाहाण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत.

 1. पाचाडचा जिजाबाईचा वाडा
 2. खुबलढा बुरुज
 3. नाठो दरवाजा
 4. मशीद मोर्चा
 5. महादरवाजा
 6. स्तंभ
 7. राजभवन
 8. राजसभा
 9. नगारखाना
 10. बाजारपेठ
 11. शिर्काई देऊळ
 12. जगदीश्वर मंदिर
 13. महाराजांची समाधी
 14. कुशावर्त तलाव
 15. वाघ दरवाजा
 16. टकमक टोक
 17. हिरकणी बुरुज

Que. 4. रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Ans. रायगड किल्ला कोंकण विभागातील रायगड जिल्ह्यात आहे.

1 thought on “रायगड किल्ला माहिती | Raigad Fort Information in Marathi”

Leave a Comment