पन्हाळा किल्ला माहिती | Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala Fort Information in Marathi :

पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर च्या ऊत्तरेला 20 कि.मी. अंतरावर आहे. पन्हाळा किल्ला विषयी आपण जेव्हा कधी लहान असतांना ऐकत होतो तेव्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच लढवय्ये बाजीप्रभू देशपांडे यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala Fort Information in Marathi सोबतच पन्हाळा किल्ला व या किल्ल्याचा इतिहास वाचून तुमच्या अंगावर काटा येईल या इतिहासावर सुद्धा एक नजर टाकूयात. आज जर तुमचा पन्हाळा किल्ला Visit करण्याचा Plan असेल तर पन्हाळा किल्ल्यावर कसे पोहचाल? पोहचल्यानंतर पन्हाळा किल्ला वरील पाहण्यासारखी ठिकाणे कोणकोणती आहेत? हि सगळी माहिती अगदी Detail मध्ये पाहुयात, चला तर मग पन्हाळा किल्ला माहिती मराठीत पाहुयात

पन्हाळा किल्ला माहिती | Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून तो समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आहे. पन्हाळा तालुक्यात कोल्हापूर शहराच्या वायव्येस बारा मैलावर हा गड आहे. हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याने १२०० वर्षांपूर्वी बांधला.

पन्हाळ गडाचा इतिहास | Panhala fort history in Marathi

महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. २ मार्च १६६० रोजी सिद्दी जौहरने घातलेल्या वेढ्यात शिवराय पन्हाळ गड या किल्ल्यावर अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळ्यावरुन निसटले. बरोबर शिवा काशीदने (शिवरायांसारखा दिसणारा ) व बाजीप्रभू देशपांडे होते.

शिवा काशीदने शिवरायांच्या वेशात शत्रूला हुलकावणी देत वेढा फोडला. शिवरायांना निसटून जायला वाव मिळाला. पुढे बाजीप्रभूने घोडखिंडीत शत्रूला थोपवून धरले. शिवराय विशाळगडावर सुखरुप पोहचल्यावर बाजीप्रभूने प्राण सोडला. अशाप्रकारे शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले.

बाजीप्रभू देशपांडे यांचे वीरमरण माहिती मराठी | पावनखिंड माहिती मराठी

बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढाई :

अफजल खानाच्या वध आणि विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड शिवाजी महाराजांनी जिकल्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला. म्हणून त्याने सिद्दी जौहर या सरदाराला सैनिकांसोबत शिवरायांवर आक्रमण करण्यासाठी पाठवले.

पन्हाळगडावरील वेढा :

सिद्दी जौहर आणि त्याच्या सैनिकांनी पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. शिवरायांना वाटलं कि पावसाळा सुरु होताच सिद्दी जौहर वेढा उठवेल पण वेढा उठविण्या ऐवजी सिद्दी जौहरने वेढा अधिकच कडक केला. आता शिवरायांना कळले कि येथे शक्तीचे काम नाही तर युक्तीने काम करावे लागेल.

लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहर ला पाठवला. हे ऐकून सिद्दी जौहर आणि त्याचे सैनिक आनंद साजरा करण्यात दंग झाले. याच संधीचा शिवाजी महाराजांनी फायदा घेतला.

शिवराय वेढयातून बाहेर पडले :

शिवरायांनी वेढयातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली. दोन पालख्या तयार केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. त्यासाठी एक बहादूर तरूण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याचे नाव होते शिवा काशिद.

ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली. शत्रूंनी ती पालखी पकडली. शिवाजीराजाच पकडला! असे समजून त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. थोड्या वेळाने शिवा काशिदचा डाव उघडकीस आला. तेव्हा सिद्दीने संतापून त्याला तत्काळ ठार केले. शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशिदने आत्मबलिदान केले. तो अमर झाला.

शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी चवताळून गेला. त्याने तातडीने मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठवले. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्यावर गाठले. शिवराय पेचात पडले. त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली.

बाजीप्रभूचा बाणेदारपणा :

चवताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांनी बाजीप्रभूला म्हणाले, “बाजी, वेळ आणीबाणीची आहे. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली. शिवरायांचे जीवित धोक्यात होते. सारे स्वराज्य धोक्यात होते.

बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. तुम्ही निर्धास्तपणे जा.” बाजीप्रभूची स्वामिभक्ती बघून शिवराय गहिवरले.

शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, “आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील; मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. मग बाजीप्रभूने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला.

शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला. पहिली तुकडी नामोहरम झाली. मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, “हाणा, मारा.” मावळ्यांना स्फुरण चढले. ‘हर हर महादेव’ अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला.

तिकडे विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूच्या । मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते.

बाजीचा पराक्रम :

इकडे घोडखिंडीत शर्थीची झुंज अजून चालू होती. सिद्दी चिडला होता. त्याची तिसरी तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्थ केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी त्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले.

जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मधेच ओरडून मावळ्यांना सूचना दिली. मावळ्यांनी शत्रूवर निकराचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता, तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते.

ती पावनखिंड :

एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफांचे आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. “महाराज गडावर पोहोचले. मी माझी चाकरी बजावली. आता मी सुखाने मरतो,’ असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला.

ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली, तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले, “बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्थ केली!” बाजीप्रभूसारखे देशभक्त होते, म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले.

त्या स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली. ‘पावनखिंड’ या नावानेच इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू !


१७१० मध्ये पन्हाळगड कोल्हापूरच्या छत्रपतींचे राजधानीचे ठिकाण बनले. १८४४ मध्ये मात्र हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

हे सुद्धा वाचा : —>

पन्हाळा किल्ला वरील पाहण्यासारखी ठिकाणे

अंबरखाना : हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्याभोवती खंदक आहे. येथेच गंगा, यमुना व सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ इथे होती.

राजवाडा : हा ताराबाईंचा वाडा प्रेक्षणीय असून त्यातील देवघर बघण्यासारखे आहे.

सज्जाकोठी: याच इमारतीत संभाजी राजांना शिवरायांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांची गुप्त खलबत करण्याची ही जागा होती.

राजदिंडी : विशाळगडाकडे जाणारी ही दुर्गम वाट. शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून याच वाटेने ४५ मैल अंतर कापत विशाळगडावर पोहचले.

चार दरवाजा : हा पूर्वेकडील अत्यंत महत्त्वाचा दरवाजा. १८४४ मध्ये इंग्रजांनी तो पाडून टाकला. येथेच शिवा काशीद यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव : गडाच्या पेठेलगत एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठी सोमेश्वर मंदिर आहे.

रेडे महाल : ही एक आडवी इमारत आहे. त्यात जनावरे बांधत.

अंदरबाव : तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. तर मधला मजला ऐसपैस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.

महालक्ष्मी मंदिर : राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरु उद्यानाच्या खालच्या बाजूस हे मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर असून साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे.

तीन दरवाजा : हा पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यांनिशी किल्ला जिंकला होता.

बाजीप्रभुंचा पुतळा : बस थांब्यावरुन खाली आल्यावर बाजीप्रभुंचा आवेशपूर्ण पुतळा दिसतो. या गडावर राहण्याची व जेवणाची सोय आहे.

पन्हाळा गडावर कसे जायचे?

पन्हाळा किल्ला कोल्हापूर पासून उत्तरेला २० कि.मी. च्या अंतरावर आहे. कोल्हापूरला पोहचल्यानंतर एसटी बस ने किंवा टॅक्सी ने गडापर्यंत पोहचू शकता.

FAQ

Que. 1. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Ans. पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे.

Que. 2. पन्हाळ्याचा वेढा किती दिवस?

Ans. पन्हाळ्याचा वेढा तब्बल चार महिने होता.

Que. 3. सिद्धी जोहर ने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता?

Ans. पन्हाळा किल्ल्याला सिद्धी जोहर ने वेढा दिला होता.

Que. 4. पन्हाळा किल्ला कोणी व केव्हा बांधला?

Ans. पन्हाळा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याने १२०० वर्षांपूर्वी बांधला.

1 thought on “पन्हाळा किल्ला माहिती | Panhala Fort Information in Marathi”

Leave a Comment