भूकंप म्हणजे काय | Bhukamp Information in Marathi

भूकंप म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला लहानपणापासूनच पडत आलेला आहे, परंतु या मागील वैज्ञानिक कारण आपल्याला माहित नसल्यामुळे आपण आज्जी आज्जोबांच्या गोष्टींवर विश्वास ठेवायचो. भूकंप म्हणजे काय हे आपण शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत.

या लेखात आपण पाहुयात कि, नेमकं भूकंप म्हणजे काय? भूकंप का होतो? भूकंपाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत? भूकंपाची पूर्व सूचना कशी मिळते? भूकंप कसा मोजला जातो? महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेले भूकंप आणि या विपदेतून आपण आपले संरक्षण कसे करू शकतो? हि सर्व माहिती एक एक करून भूकंप माहिती – Bhukamp Information in Marathi या Article मध्ये बघुयात.

भूकंप म्हणजे काय? | Earthquake in Marathi

भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते | Bhukamp Information in Marathi :

भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात.

भूकंप का होतो?

लाखो वर्षापूर्वी पृथ्वी एक आगीचा गोळा होता. हा गोळा हळूहळू थंड झाला. पण पृथ्वीचा केंद्रभाग आजही गरम आहे. तिथे खडक द्रव अवस्थेत आहेत. जेव्हा ज्वालामुखी फुटतो तेव्हा भूगर्भातील द्रवपदार्थ वेगाने बाहेर येतात. ज्वालामुखी फुटताना जी कंपने निर्माण होतात, त्यामुळे भूकंप निर्माण होतो. पण असे भूकंप विनाशकारी नसतात.

भूकंपाची कारणे :

 • भूपट्ट सरकणे.
 • भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
 • भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
 • भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
 • ज्वालामुखींचे उद्रेक होणे.

भूकंपनिर्मितीची कारणे :

भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते. भूकंप निर्मितीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१) ज्वालामुखी :

ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे भूकंपांची निर्मिती होऊ शकते. अशा भूकंपांचे केंद्र सहसा कमी खोलीवर असतत आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच यांचा परिणाम पाहावयास मिळतो. उदा. १९८१ साली कॅसकेड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्याच वेळेस सेंट हेलेन्स येथे ५.५ या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता.

हे सुद्धा वाचा : –

२) भूविवर्तनकी हालचाल:

भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्‌ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागावर हे तरंगत असतात. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालींमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एकदुसऱ्या खाली जाणे इत्‍यादी बाबी घडत असतात.

इंडोनेशिया, कॅलिफोर्निया (उत्तर अमेरिका) आणि चिली (दक्षिण अमेरिका) मधील भूकंप, भारतातील उत्तर काशी आणि आसाममधील भूकंप ही या प्रकारच्या भूकंपाची उदाहरणे आहेत.

३) मानवनिर्मित भूकंप :

अलीकडच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आण्विक स्फोट, मोठ्या प्रमाणावरील खोदकाम, सुरूंगाचा वापर, अणुचाचण्या, बांधकामे तसेच खाणकाम या मानवी क्रियांमुळे देखील भूकंपांची निर्मिती होते. परंतु त्यांचे परिणाम स्थानिक असतात.

भूकंपाचे प्रकार – types of earthquake

भूकंपाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे नैसर्गिक भुकंप आणि दुसरा प्रकार म्हणजेच कृत्रिम भुकंप.

 1. नैसर्गिक भूकंप – Natural earthquake

  या प्रकारच्या भूकंपाला टेक्टोनिक भूकंप असेही म्हणतात. अशा प्रकारच्या भूकंपामागे प्लेट टेक्टोनिक हे कारण जबाबदार आहे, जरी पृथी आपल्याला एक भरीव गोळ्या सारखी दिसत असली तरी तिचा पृष्ठभाग अनेक ( भूपट्ट ) प्लेटांपासून तयार झालेला आहे. आणि जेव्हा पृथ्वीच्या भूकवचाच्या अंतर्गत भागात हालचाली होतात तेव्हा नैसर्गिक प्रकारचे भूकंप घडतात.

 2. कृत्रिम भुकंप – Artificial earthquake

  कृत्रिम प्रकारचे भुकंप हे मानव निर्मित असतात. अशा प्रकारचे भूकंप विभिन्न कारणांमुळे येऊ शकतात. जसे खूप भयंकर म्हणजेच तीव्र खाणकाम असलेल्या क्षेत्रात त्याचसोबत मोठमोठ्या जलाशय असलेल्या क्षेत्रांमुळे eg. कोयना धरणात झालेला भूकंप (December 11, 1967) आणि मानवनिर्मित घडवून आणलेल्या स्फोटांमुळे.

भुकंप लहरींचे प्रकार – types of earthquake waves

भूकंपनाभीकडून ताण मुक्त झाल्यावर, मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते. ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे तीन प्रकार होतात.

(१) प्राथमिक लहरी (Primary or ‘P’ Waves)

भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.

(२) दुय्यम लहरी (Secondary or ‘S’ Waves)

प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते. या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात. या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात; परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

(३) भूपृष्ठ लहरी (Surface or ‘L’ waves):

प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत (अपिकेंद्र) येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात.

भूकंपाची पूर्व सूचना कशी मिळते | सिस्मोग्राफ म्हणजे काय?

भूकंपाच्या लहरी सिस्मोग्राफ यंत्राद्वारे रेखांकित केल्या जातात. सर्व भूकंपीय लहरींचा वेग अधिक घनत्व असणाऱ्या पदार्थातून गेल्यावर वाढतो. तसेच कमी घनत्व असणाऱ्या पदार्थातून गेल्यावर कमी होतो.

रिश्टर स्केल :

भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एक यंत्र आहे. त्याचे संपूर्ण नाव ‘रिश्टल मॅग्निट्यूट टेस्ट स्केल’ आहे. त्याचा शोध कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या बेनो गुएटनबर्ग आणि चार्ल्स रिश्टर यांनी लावला. रिश्टर स्केलचे माप एक ते नऊपर्यंत विभागण्यात आले आहे.

रिश्टर स्केलवर एक दोन माप असणाऱ्या भूकंपाची संख्या दररोज १००० पेक्षा जास्त असते. पण त्यांची जाणीव होत नाही. त्यात कमी नुकसान होते. ७ रिश्टर पेक्षा जास्त असणारे भूकंप खूप नुकसान करतात.

भूकंपामुळे होणारे परिणाम :

 • जमिनीला तडे पडतात.
 • भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
 • काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा., विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
 • काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
 • सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
 • हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
 • इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
 • वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
 • संदेशवहन व्यवस्था कोलमडते.

टेक्टोनिक प्लेट | Plate Tectonic In Marathi

साधारणपणे सर्व मोठ्या भूकंपामागे प्लेट टेक्टोनिक हे कारण जबाबदार आहे, पृथ्वी अनेक ( भूपट्ट ) प्लेटांपासून तयार झालेली आहे. पृथ्वीचे केंद्र द्रव अवस्थेत आहे. त्यामुळे ही प्लेट खूप हळुवारपणे तरंगत राहते. प्लेटांचा वेग खूप प्रमाणात द्रव निर्माण करतो.

भूकंपाचे केंद्र आणि अधिकेंद्र :

भूकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात. या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात.

भूकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो. भूपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लबरूप असते.

म्हणजेच पृथ्वीच्या मधल्या भूकंपाच्या उगम स्थानाला त्याचे केंद्र म्हणतात. अशाप्रकारे भूकंप केंद्राच्या वरच्या पृथ्वीच्या कडेला असणाऱ्या बिंदूला भूकंपाचे अधिकेंद्र म्हणतात.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेले भूकंप

कोयना नगर धरण येथे झालेला भूकंप (December 11, 1967), लातूर भूकंप १९९३ भयंकर जीवितहानी झाली होती. आत्ता Recent झालेला भूकंप गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात नोव्हेंबर महिन्यात २०२१.

भूकंप म्हणजे काय | Bhukamp Information in Marathi किंवा भूकंप माहिती – Bhukamp Information in Marathi या विषयावर दिलेली माहिती पूर्ण वाचल्यानंतर तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पाडेल.

भूकंप म्हणजे काय | Bhukamp Information in Marathi आणि भूकंप माहिती – Bhukamp Information in Marathi मध्ये आवडल्यास नक्की खाली Comment करून सांगा आणि हि माहिती आपल्या मित्रांपर्यंत Share करा.

1 thought on “भूकंप म्हणजे काय | Bhukamp Information in Marathi”

Leave a Comment