स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी | Swatantra Veer Savarkar Information in Marathi

सावरकर आज जरी आपल्यात नसले तरी ते कीर्तिरूपाने शिल्लक आहेत. त्यांच्या कडून अनेकांना स्फूर्ती लाभली आहे आणि लाभत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त हिंदूंचा विचार करतात असा काही लोकांचा गैरसमज झालेला होता. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर ख्रिस्ती, मुसलमान समाजाला देखील मानत होते. ते कधीही इतर धर्मांचा द्वेष करत नव्हते.

नमस्कार मित्रांनो आपण या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी, Detail मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती पाहणारच आहोत पण त्याचसोबत अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली होती ? सावरकरांचे साहित्य कोणकोणते होते, किंवा वि दा सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, सावरकरांच्या कविता कोणत्या, सावरकरांच्या विचारातील महत्त्वाचे सूत्र कोणते.

वि.दा. सावरकर कोणत्या वर्षी हिंदू महासभेचे अध्यक्ष निवडले गेले ? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मेयर या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर काय केले ? राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते ? हि सर्व माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध च्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी (Swatantra Veer Savarkar Information in Marathi) मध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास पाहुयात.

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचा जन्म :

सावरकरांचे मूळचे घराणे कोकणातले निसर्गरम्य परिसरात पूर्वजांचे घर होते. कोकण सोडून पूर्वज नाशिकला आले. आपल्या कार्यानी त्यांनी नाशिकमध्ये नावलौकिक मिळविला. नाशिक जवळ भगूर नावाचे एक गाव आहे.

भगूर या गावी २८ मे १८८३ रोजी विनायक सावरकरांचा जन्म झाला. वडिलांचे नाव दामोदर व आईचे नाव राधाबाई होते. दोन मोठी मुले भाऊ गणेश (बाबा) धाकटाभाऊ नारायण (बाळ) व बहिणमाई, विनायक अशी चार भावंडे.

देवघरात केलेली प्रतिज्ञा

इंग्रजांचा सतत जनतेवर अत्याचार होत होता. हे अत्याचार पाहून पुण्यातील चाफेकर बंधूना अतिशय राग आला. हा अत्याचार करण्यास भाग पडणारा इंग्रज अधिकारी ‘रँड’ याला चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ साली गोळ्या झाडून ठार केले.

या प्रकरणात चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली त्यावेळी चाफेकर बंधूंनी हातात गीता घेऊन शौर्याने भारत मातेचा जय जयकार करत फाशी स्वीकारली. देशासाठी ते फासावर गेले हि गोष्ट विनायकाच्या हृदयात कोरली गेली होती.

विनायक देवघरात आले, देवीची प्रार्थना केली. “मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करिन. माझ्या देशात आलेल्या इंग्रजांना येथून हाकलवून लावीन. देवी तू मला सामर्थ्य दे. भारतमातेच्या पायातील शृंखला मला तोडून टाकायच्या आहे. या साठी मी सदैव झगडत राहीन. हुतात्मा चाफेकरांचे कार्य मी पूर्ण करिन.”

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षण

१९०१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वीच त्यांचा रामचंद्र त्र्यंबक उर्फ भाऊराव चिपळूणकर यांच्या कन्येशी झालेला होता. विनायकांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. चिपळूणकरांनी सावरकरांची बुद्धिमत्ता पाहून, शिक्षणासाठी सावरकरांना १९०१ साली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये विद्यार्थी म्हणून दाखल केले.

नंतर सावरकरांनी बी.ए पदवीदेखील मिळविली त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी सावरकर मुंबईला आले. त्यावेळी श्यामजी कृष्ण वर्मा या इंग्लंड मधील क्रांतिकारक नेत्याने सावरकरांची शिवाजी शिष्यवृत्तीसाठी निवड केली. मात्र शिष्यवृत्ती देतांना एक अट घातली होती, ती म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांची नोकरी करायची नाही. हि अट त्यांनी लगेच मान्य केली.

सावरकरांनी इंग्लंड ला जाऊन तेथे बॅरिस्टर होण्याचे निश्चित केले. सावरकर बॅरिस्टर बनण्यासाठी आणि सशस्त्र क्रांतीचा प्रचार करण्यासाठी इंग्लंडला जाण्यासाठी निघतांना लोकमान्य टिळक यांची भेट घेतली. १९०६ ते १९१० या चार वर्षात सावरकरांनी खूप अभ्यास केला आणि अभ्यासाबरोबर सशस्त्र क्रांतीची संघटना देखील सुरु केली.

लंडन मध्ये इंडिया हाऊस होते. तेथे सावरकर उतरले. भारतातून अनेक लोक शिक्षणासाठी लंडनला येत होते. प. श्यामकृष्ण मुखर्जी यांनी त्यांची भोजनाची आणि राहण्याची सोय केली होती.

सावरकरांनी अभ्यासात सातत्य ठेवून चांगला अभ्यास करून बॅरिस्टर बनले. परंतु दरम्यान भारतीय स्वातंत्र्य लढयात सावरकरांचा हात आहे हे इंग्रजांना कळून आल्यावर इंग्रज सरकारने त्यांना बॅरिस्टरची सनद देण्याचे नाकारले. सनद नाकारण्याच्या मागे आणखी एक कारण म्हणजे मदन लाल धिंग्रा यांनी कर्जन वायली याची गोळ्या घालून हत्या केली. धिंग्राना न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वी गुन्हेगार ठरवण्याचा सावरकरांनी जाहीर निषेध केला. म्हणून त्यांना बॅरिस्टरची सनद देण्याचे नाकारले.

सशस्त्र क्रांतीची प्रेरणा

वीर सावरकर जेव्हा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षण घेण्याकरिता गेले तेव्हा तिथे आचार्य काकासाहेब कालेकर तसेच द.भ. आचार्य कृपलानी यांचे कडून महात्मा गांधींचे विचार ऐकावयास मिळाले होते. सत्य आणि अहिंसा हे विचार समजून घेतले होते.

सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडून देशवासीयांवर होणार अन्याय प्रत्येक्ष जवळून पाहिलेला होता. याची त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. त्यामुळे फर्ग्युसन टेकडीवर रात्री अंधारात मित्रांना एकत्र करून ते सशस्त्र क्रांतीची योजना बनवीत असत. वीर सावरकरांची विचारसरणी जहाल होती. त्यांना अन्याय थोडा देखील सहन होत नव्हता.

सावरकर आपल्या भाषणातून उघडपणे सशस्त्र क्रांतीची योजना मांडत असत. ब्रिटिशांची सत्ता नाहीशी करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करावाच लागेल असे त्यांना वाटत असे. रणावीण स्वातंत्र कोणा मिळेल? असा प्रश्न ते विचारीत असे. या सर्व घडणाऱ्या घटनांमुळे सावरकर यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळालेली होती.

स्वतंत्र वीर सावरकरांनी स्थापन केलेल्या क्रांतिकारी संघटना

इकडे महात्मा गांधी सत्य व अहिंसेच्या मार्गाने अहिंसेसाठी प्रयत्न करीत होते. सेनापती पां.म. बापट हे पूर्णपणे गांधीवादी बनले होते. पूर्वी ते सावरकरांच्या प्रमाणे जहाल क्रांतिकारी होते. वि.दा. सावरकर यांना गांधीजींचे विचार मेनी होते, परंतु इंग्रज सरकार आपल्या देशावर करत असलेले अत्याचार ते उघडया डोळ्यांनी पाहत होते.

आपल्या देशबांधवांवर होणारे थोडीदेखील अन्याय अत्याचार वि.दा. सावरकर यांना मान्य नव्हते. गांधीजींचे कार्य अहिंसेच्या मार्गाने चालू असतांना आपण हिंसेच्या मार्गाने प्रयत्न केला पाहिजे असे त्यांना वाटत होते. म्हणून स्वातंत्र वीर सावरकर यांनी काही क्रांतिकारी संघटना स्थापन केलेल्या होत्या.

मित्रमेळा संघटनेची स्थापना

स्वातंत्र वीर सावरकर यांच्यात बालपणापासून संघटन करण्याचे कौशल्य होते. 1899 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी “राष्ट्रभक्त समूह” या गुप्त मंडळाची स्थापना केली. सण १९०० मध्ये लोकमान्य टिळकांच्या देशप्रेमाच्या विचारांनी सावरकरांना स्फूर्ती प्राप्त झाली.

याच दरम्यान वीर सावरकरांनी अनेक समविचारी मुलांना एकत्र करून १९०० साली ‘मित्रमेळा’ या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या मनामध्ये देशाला स्वातंत्र मिळावे हाच हाच एक ध्यास होता.

अभिनव भारत

अभिनव भारत हि संघटना म्हणजेच सण १९०० मध्ये स्थापन केलेल्या मित्रमेळा संघटनेचेच रुपांतर होते. १९०४ मध्ये मित्रमेळा संघटनेचे रूपांतर झाले आणि त्या संघटनेला नाव देण्यात आले ‘अभिनव भारत‘. अभिनव भारत हि संघटना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना होती.

अभिनव भारत संघटने मार्फत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जहाल मतांच्या तरुणांना एकत्र केले. शस्त्राशिवाय क्रांती होणार नाही असे ते तरुणांना समजावून सांगत. सशस्त्र क्रांती करणे हा या संघटनेचा उद्देश होता. हि संघटना गुप्तपणे काम करत असे. या संघटनेखाली सावरकरांनी देशासाठी देहत्याग करणाऱ्या तरुणांना एकत्र के होते.

पुढे अभिनव भारत याच संघटनेत घडलेल्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यात प्रामुख्याने १ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा ने लंडनमध्ये कर्झन वायली ची गोळ्या घालून हत्या केली. त्याचबरोबर ३१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हा एका नाट्यगृहात बसला होता त्यावेळी अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या निर्भय क्रांतिकारकाने केला.

“सावरकरांनी परदेशी कपडयांची होळी देखील केलेली होती”

सावरकरांनी परदेशी कपडयांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले. आणि ते त्यांनी करून सुद्धा दाखविले होते.

फ्री इंडिया सोसायटी

सावरकरांच्या मनात नेहमी निरनिराळे विचार स्फुरत होते. लोकांची एकी केल्याशिवाय सशस्त्र क्रांती होऊ शकणार नाही हे त्यांनी जाणले होते. लंडन मध्येच त्यांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. फ्री इंडिया सोसायटीची स्थापना ही इटली मधील राष्ट्रवादी क्रांतिकारी नेता मॅझिनी यांच्या विचारांनी प्रेरित होती.

फ्री इंडिया सोसायटी मध्ये मॅडम काम, भाई परमानंद, लाला हरदयाळ, सेनापती बापट, मदनलाल धिंग्रा इ. कर्तबगार माणसे फ्री इंडिया सोसायटी शी जुडलेले होते.

ही सर्व मंडळी उच्च शिक्षणासाठी लंडनला आलेली होती. देशाच्या स्वातंत्र्याची ज्योत त्यांच्याही हृदयात प्रज्वलित झाली होती. लंडन मध्ये आणि भारतात इंग्रज लोक कसे छळतात याचे वर्णन करून सांगत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याबद्दल आस्था होती. त्यामुळे त्यांचा उत्सव त्यांनी लंडन मध्ये सुरु केला.

तसेच गुरुनानक, गुरुगोविंद सिंग यांचे उत्सव सुरु केले. भारताचा इतिहास हा पराक्रमाचा आहे हे त्यांनी लोकांना पटवून द्यायचे होते. दसरा-दिवाळी सन साजरे करीत. भारतीय संस्कृती टिकून राहावी हि विचारसरणी त्यांच्या मनामध्ये होती.

सावरकरांना अटक

सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार हे विनायक दामोदर सावरकर आहेत हे इंग्रजांना कळाले. त्यामुळे इंग्लंडमध्ये १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक करण्यात आले. सावरकरांना याची जाणीव होती. ते कोणत्याही गोष्टीला भीत नव्हते. हि बातमी जेव्हा त्यांच्या मित्रांना कळाली. तेव्हा त्यांना हा खटला इंगलंड मध्ये चालवावा असे त्यांना सांगितले.

परंतु लंडनच्या न्यायालयातील हा खटला भारतात चालवावा असा निर्णय देण्यात आला. त्यामुळे लंडनच्या कारागृहातून त्यांना भारतात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सावरकरांचा खटला भारतात चालवायचा आहे म्हणून इंग्रज लोक मोरिया बोटीने १ जुलै १९१० रोजी सावरकरांना घेऊन निघाले.

बोटीतून पलायन :

भारताकडे निघालेली बोट वाटेमध्ये फ्रान्समधील मार्सेल बंदरावर नादुरुस्तीच्या कारणावरून थांबवण्यात आलेली होती. सावरकर मनामध्ये विचार करत होते बोट आता थांबली आहे आपण पळून जाण्याचा काही ना काही तरी मार्ग शोधला पाहिजे शेवटी त्यांनी तिथून समुद्रात उडी मारून पलायन केले पण एवढा प्रयत्न करूनही तो प्रयत्न सफल झाला नाही.

नाशिकच्या तुरुंगात:

८ जुलै १९१० या दिवशी सावरकरांनी बोटीतून उडी मारली पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही अशा परिस्थितीत त्यांना नाशिकच्या तुरुंगात आणण्यात आले. इंग्रज सरकारला सावरकरांची भीती वाटत होती. यांच्यामुळे आपणास देश सोडून जावे लागेल कि काय असे त्यांना वाटत होते.

जन्मठेपेची शिक्षा :

मुंबईच्या विशेष न्यायालयात राजद्रोहाचा कात करणे, शस्त्रास्त्रे जमविणे आणि भारतात शस्त्रे पाठवून ब्रिटिश अधिकाऱ्यांचे वाढ करणे, असे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. इंग्रजांनी खोटे साक्षीदार तयार केले होते. या खोट्या साक्षीदारांनी पैशासाठी खोटी साक्ष दिली. जॅक्सनचा खून झाला त्यावेळी सावरकर जवळच हातात पिस्तूल घेऊन उभे होते. हि साक्ष एकूण सर्वांना आश्चर्य वाटले कारण त्यावेळी सावरकर भारतात नव्हते तर लंडनला होते.

ब्रिटिश सरकारला सावरकरांना फाशी द्यायची होती. सावरकर अनेक तरुणांना एकत्र करून सशस्त्र क्रांतीची ज्योत प्रज्वलित करीत होते. त्यामुळे सावरकरांच्यावरती इंग्रजांचा राग होता.

न्यायाधीशाने सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि त्यांनी निकाल दिला. विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. वास्तविक पाहता त्यांना फाशी दिली पाहिजे. परंतु त्यांच्यावर दया दाखवून आम्ही त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा करीत आहोत. दोन जन्मठेपेची शिक्षा असे कधी जगामध्ये घडले नाही. दोन जन्मठेपेची शिक्षा म्हणजे २५ बाय २ म्हणजे ५० वर्षे अंदमान येथील काळ्यापाण्याची शिक्षा तसेच त्यांना दिलेल्या सर्व सनद, पदव्या मालमत्ता वैगेरे जप्त करण्यात आले.

अंदमानातील यातना:

महाराजा बोटीतून प्रवास करत ४ जुलै १९११ रोजी सावरकरांना अंदमानात आणण्यात आले. तुरुंग अधिकारी अतिशय भयानक होता. अंदमान तुरुंग म्हणजे ज्याप्रमाणे नार्कामध्ये पापी माणसांना अनेक यातना भोगाव्या लागतात. त्याप्रमाणे अंदमानचा तुरुंग एखादा नाराकपूर सारखा होता. अनेक राजकीय कैद्यांना तेलाच्या घाण्याला जुंपले जात असे त्या घाण्याला कुलू असे म्हणत. हा कुलू ओढून शक्तिशाली माणूस देखील काही दिवसातच अत्यंत अशक्त होत असे.

नरक यातनेतून सुटका:

सावरकर तुरुंगात जरी शिक्षा भोगत होते तरी पण या तुरुंगात किती त्रास आहे हे चिट्ठीवर लिहून समाजात पोहचवीत होते. तुरुंगातील सारी शिक्षा भोगत असतांना सावरकर अतिशय आजारी पडले. हि बातमी सर्वत्र देशात पसरली. त्यामुळे सावरकरांना सोडण्यासंबंधी पुनः इंग्रज सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.

१० वर्षे सावरकर अशा महा भयंकर कठीण यातना भोगत होते. त्यामुळे त्यांची तब्येत अतिशय अशक्त झाली. सावरकरांचे काही बरे वाईट झाले तर सगळी जनता आपणास त्रास दिल्याशिवाय राहणार नाही हे जाणून २ मे १९२१ रोजी सावरकरांची सुटका झालं;इ. त्या दहा वर्षाच्या काळात त्यांनी अपार कष्ट सोसले होते.

पुनः रत्नागिरीच्या तुरुंगात :

सावरकर भारतात आल्यावर त्यांना पुन्हा रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. समाजाला सतत काही ना काही सांगावे असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांना पुन्हा रत्नागिरीच्या तुरुंगात जावे लागले.

त्यानंतर सावरकरांना येरवड्याच्या तुरुंगात सुद्धा काही काळ राहावे लागले. त्यानंतर त्यांच्यावर काही बंधनकारक अति घालून त्यांना सोडण्यात आले. जसे कि, रत्नागिरीच्या सिमेंटचा पाच वर्षे राहणे आणि कोणत्याही प्रकारच्या राजकीय चळवळीत भाग न घेणे अशा त्यांच्या दोन अटी होत्या. यानंतर त्यांनी काही सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून ठेवले.

  • जातीभेद नष्ट करणे
  • नवीन मंदिरांची पायाभरणी करणे (जसे कि हिंदू पतित पावन मंदिर)
  • हिंदुमहासभेतील कार्य

पुनः एक वर्ष कारागृहात:

३० जानेवारी १९४८ रोजी दिल्ली येथे नथुराम गोडसे याने महात्मा गांधीजींची हत्या केली. या प्रकरणात सावरकरांना पकडण्यात आले. गोडसे याच्या कृत्याला सावरकरांची संमती होती, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. एक वर्ष कारागृहाची शिक्षा भोगावी लागली आणि पुराव्या अभावी पुनः सोडून देण्यात आले.

सावरकरांचे साहित्य | वि. दा. सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला

मॅझिनीचे चरित्र :

स्वातंत्रविरांची चरित्रे सावरकरांना फार आवडत होती. त्यामुळे त्यांच्या चरित्रांचे वाचन अत्यंत आवडीने करत असत. मॅझिनी हा आदर्श पुरुष त्यांना वाटत होता. म्हणून त्यांनी मॅझिनीचे चरित्र लिहिले. त्याचबरोबर त्यांच्या विचारांवर आयर्लंडचा स्वातंत्रवेत्ता डी. व्हॅलेरा हे सुद्धा आदर्श वाटत होते म्हणून सावरकरांच्या मनावर काही प्रमाणात डी. व्हॅलेरा यांचे विचार पाहायला मिळते.

“१८५७ चा स्वातंत्र संग्राम” किंवा “1857 चं स्वातंत्र्यसमर” :

सावरकरांनी १८५७ मधील स्वातंत्रविरांचा गौरव करण्याकरिता स्मृतिदिन साजरा केला. अनेक लोकांना इंग्रज भारतीय लोकांचा किती छळ करतात आणि स्वातंत्र मागितले तरी देण्यास तयार होत नाहीत हे कळावे असे सावरकरांना वाटत होते. म्हणून “१८५७ चा स्वातंत्र संग्राम” नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. इंग्रजांचे वागणे संपूर्ण जगाला कळावे असे सावरकरांना वाटत होते. या ग्रंथामुळे भारताबद्दल आदरभाव जगामध्ये वाढला.

माझी जन्मठेप :

रत्नागिरीच्या तुरुंगात त्यांना लेखन साहित्य मिळाले आणि त्यामुळे त्यांच्या लेखन कार्यास सुरुवात झाली. ‘माझी जन्मठेप’ हा ४३० पृष्ठाचा एक ग्रंथ त्यांनी तुरुंगात बसून लिहिला.

हिंदुत्व :

हिंदुत्व नावाचा प्रबंध देखील सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगात असतांना लिहिलेला होता.

कमला हे महाकाव्य :

जेव्हा स्वातंत्रवीर सावरकर यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली तेव्हा ते अंदमान येथील तुरुंगात असतांना “कमला” नावाचे महाकाव्य लिहिलेले होते.

हिंदुमहासभा व स्वातंत्रवीर सावरकर

सावरकरांचे कार्य सातत्याने सुरु होते. सर्व हिंदुना एकत्र करण्याच्या कामी त्यांना अनेक लोकांनी सहकार्य केले. त्यांना अनेक महापुरुष भेटले. लाला लजपतराय, मदनमोहन मालवीय, स्वामी श्रद्धानंद, डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी, बॅ. निर्मलचंद्र चटर्जी, डॉ. हेडगेवार, न.चि. केळकर, गुलाबचंद हिराचंद, श्री.म.माटे आदिचा सहभाग होता. या सर्वांच्या सहकार्यामुळे हिंदूचे संघटन करण्यास सावरकरांना फार मोठा आधार मिळाला.

१९३७ ते १९४२ या सहा वर्षाच्या काळात दरवर्षी होणाऱ्या हिंदुमहासभेच्या वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षपदी सावरकरांची एकमताने निवड झाली. कर्णावती, नागपूर, कलकत्ता, मदुरा, भागलपुर, कानपूर या ठिकाणच्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते. त्यामुळे अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू जनतेला संदेश देण्याचे काम सातत्याने केले. हिंदु लोकांनी मोठ्याप्रमाणामध्ये सैन्यामध्ये सामील व्हावे आणि सशस्त्र लढाईचे शिक्षण घ्यावे. आपल्या विरोधकाचा मुकाबला लढूनच करावा लागतो.

शूर सैनिकानी लढाईला घाबरु नये. इंग्रज सैनिक देत असलेला त्रास सावरकरांनी अनेक वेळेला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला ते निधड्या छातीचे होते. साहस त्यांच्या मनोमन भरलेले होते ते अन्याया विरुद्ध सतत लढत होते. १९३८ साली जानेवारी महिन्यामध्ये बडोद्या येथे भरलेल्या स्थानिक वाङमय परिषदेचे ते अध्यक्ष होते एप्रिल महिन्यात मुंबईला भरलेला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

चा मोठा सन्मान करण्यात आला होता. ते उच्च प्रतीचे एक प्रतिभावंत कवि होते, नाटककार होते. निबंधकार होते. त्यांना अनेक वर्ष तुरुंगात त्रास भोगावा लागला म्हणून त्यांच्या हातून एवढे लिखाण झाले नाही. १९४२ साली सांगली येथे झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. भारताला अजून स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. म्हणून त्यांनी अध्यक्षपदावरुन लोकांना उपदेश केला की, साहित्यकारानी आता हातातील लेखणी मोडून टाकाव्यात आणि हातात बंदुका घ्याव्यात.

हिंदुराष्ट्रवाद

हिंदुराष्ट्रवादी विचाराचे ते प्रमुख जनक बनले होते. आपल्या देशाला हिंदुस्तान हे नाव हिंदु शब्दावरुन निर्माण झाले. हिंदुस्थान म्हणजे हिंदुचा राहण्याचा देश आहे. प्रामुख्याने या देशात हिंदु लोक जादा प्रमाणात राहतात. सिंधु नदीपासून सिंधु पर्यंत म्हणजे हिंदी महासागरापर्यंत विस्तारलेली ही भूमी ज्याच्या पूर्वजांची आहे आणि हिंदु संस्कृतीचा त्याचा वारसा मिळालेला आहे.

ज्या संस्कृतीवर आपली संस्कृती म्हणून जो अधिकार सांगतो, जो आपल्या भूमीला धर्मपुरुषांची पवित्र भूमी मानतो, तो हिंदु होय. सावरकर ख्रिस्ती, मुसलमान समाजाला मानत होते. त्यांचा द्वेष करत नव्हते. परंतु सावरकरांचे विचार अनेकांना कळाले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त हिंदूंचा विचार करतात असा काही लोकांचा गैरसमज झालेला होता.

सावरकरांनी जगाचा निरोप घेतला

२६ फरवरी १९६६ चा दिवस उजाडला त्यावेळी सावरकर ८३ वर्षांचे होते. त्यांनी अन्नपाणी घेणे बंद केले होते. भारत मातेला नमस्कार करत त्यांनी आपला देह ठेवला.

प्रश्नोत्तरे

Que. 1. वि. दा. सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

Ans. मॅझिनीचे चरित्र, “१८५७ चा स्वातंत्र संग्राम” किंवा “1857 चं स्वातंत्र्यसमर” नावाचा ग्रंथ, माझी जन्मठेप नावाचा ग्रंथ, ‘हिंदुत्व’ नावाचा प्रबंध, ‘कमला’ हे महाकाव्य.

Que. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मेयर या इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर काय केले ?

Ans. महापौर

Leave a Comment